Mumbai University Started a new course BBA LLB From this year all details of new Course are given below.
मुंबई विद्यापीठाची स्थापना होऊन जवळपास 156 हून अधिक वर्ष झाली आहेत. देशाच्या आणि विशेषत: मुंबईच्या विकासात या विद्यापीठाने बहुमोल योगदान दिले आहे. या विद्यापीठाची मुंबईत 2 संकुले आहेत. त्यातील विद्यानगरी, सांताक्रुझ येथील संकुल 243 एकरात तर फोर्ट परिसरातील संकुल 14 एकर परिसरात उभे आहे. याशिवाय विद्यापीठाची ठाणे, कल्याण, रत्नागिरी येथे उपकेंद्रे आहेत.
विद्यापीठात 60 विभाग व संस्था असून 749 महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. विद्यापीठात विविध विषयातील पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम राबविण्यात येतात. विद्यापीठातील प्राध्यापकांनी गेल्या 5 वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील 18 पुरस्कार मिळविलेले आहेत. दरवर्षी विविध शैक्षणिक कारणास्तव विद्यापीठातील अध्यापक विदेशात भेटी देत असतात.
विद्यापीठाने 10 स्वयंसहाय्य अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यापैकी 5 वर्ष कालावधीच्या बीबीअेएलएलबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची नुकतीच घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात असणाऱ्या युनिवर्सिटी नॅशनल लॉ स्कूलमध्ये 60 तर ठाणे उप केंद्रात असलेल्या स्कूल ऑफ लॉ येथे 60 जागा उपलब्ध आहेत. या सर्व जागा गुणवत्तेच्या आधारे भरण्यात येतील. विद्यापीठ आणि सरकारच्या आरक्षणाच्या धोरणानुसार विविध संवर्गातील उमेदवारांना आरक्षण उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी आर्टस्, कॉमर्स, सायन्समध्ये बारावीच्या/समकक्ष परीक्षेत किमान 45% तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी 40% गुण मिळविलेले असणे आवश्यक आहे. एकूण जागांच्या 85% जागा या महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहेत. मार्च, 2016 च्या बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल, 2016 अशी आहे. या अभ्यासक्रमासाठी शनिवार दि. 30 एप्रिल, 2016 रोजी दुपारी 3.00 ते 5.00 वाजता फोर्ट संकुलात आणि ठाणे उप केंद्रात प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.
अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी कृपया विद्यापीठाच्या http://mu.ac.in/portal/wp-content/uploads/2015/04/MUCLET.pdf या संकेतस्थळाला भेट द्यावी.
व्यवस्थापन आणि कायद्याची सांगड घालून आखण्यात आलेला हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना भविष्यात उत्तम संधी आहे.
Related
Source: Jobsnews